निसर्ग
मीच आनंद , मीच परमानंद , मीच अनादी , मीच अनंत !
मीच सुमित , मीच सुमंत , अन मीच तो सच्चिदानंद !
मीच सल्लागार , मीच साक्षिदार , मीच खात्री , मीच साक्षात्कार !
मीच तो ईशारा , मीच अनुभुती , मीच याचपरी , मीच तो वारंवार !
मीच मोहक चाहूल ऋतुबदलाची , मीच संकेत पाठवीतो तोची !
पशू-पक्षी आनंदी करवितो मीच , अंकुरवितो धरती मीच !
पांघरीतो हिरवा अंगरखा मीच , करीतो साजरे तो मीच !
न्हाऊन सोडतो मीच धरतीस , दवबिंदूंचा करुनी शिडकावा , फोडून हिरर्यांचा सडा , सुर्यकिरणे लुटती तो सर्वं सारा !
मीच कधी उष्म घाम धारा , कधी मीच पाऊस बरवा , गारठवितो कधी मीच , तो मीच गुलाबी गारवा !
सर्व करीतो मीच मीच , सांगतो पुन्हा पुन्हा तुस , सोबत आपुली जन्न्मांतरीची , तुझा सवंगडी अन् सखा मीच !
— संदीप सु. श. परुळकर