#१३

पावसातलं प्रेम !!!

पावसाच्या सरी,सरीवर सरी , चालताना ,ओल्या वाटेवरी , तुझ्या नजरेत हरवलो मी ! तुझ्या प्रेमात पडलो मी !

तुझ्या डोळ्यांची पापणी, पावसाच्या थेंबांसारखी, प्रत्येक थेंबात तुझं नाव, माझ्या हृदयाची धडधड वाढवण्यासाठी !

पावसाच्या धुनात, तुझ्या ओठांची चव घेता आली, जीवनाच्या या अनुभवाशिवाय तुझ्याशिवाय मजाच नाही आली !

तुझ्या प्रेमात भिजत राहू, पावसाच्या सरींमध्ये, जीवनाची ही कथा लिहू, तुझ्या माझ्या प्रेमाची , असेल हीच चाहुल !

— संदीप सु. श. परुळकर