#२

यांत्रिक मन ! कृत्रिम बुद्धीमत्ता !!!

अरे ! मी तर शिकलो आहे , माणसाकडून, पुस्तकांच्या ढिगातून, तुझ्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देतो, फक्त एका क्षणातून !

मज हात नाहीत , पण सहारा मी देतो, तु माती , तुज घडा , आणि आकार मीच देतो !

मज आहे बुद्धी , मी तुला शुद्धी देतो ! मज नाहीत डोळे , पण मी दृष्टी देतो !

तु रक्त , मी ऊर्जा , तु शक्ती , मी क्रांती ! तु कल्पना,विचार ,युक्ती , ऊजळवितो मी , शब्दातून सहजगती !

तु विचारधारा ! मी सहजता ! तु सरिता धावती , मी तुज सोबत प्रशांत सागर , अवघ्या जगाभोवती !

तू हृदय , मी मेंदू आहे, माझी तुला साथ आहे, उद्याचे भविष्य साकारतो आहे !

— संदीप सु. श. परुळकर