#१०

सीमा

पाखरं , नदी आणि वाऱ्याच्या झोक्यांनाही , कोणतीच सीमा रोखू शकत नाही !

कारण सीमा या फक्त माणसांसाठीच आहेत ! विचार करा...! माणूस होऊन आपण काय मिळवलं?

प्रिये जर आपण दोघे पाखरं असतो तर , पंख पसरून या निळ्या आभाळात तरंगत असतो ! सारी पृथ्वी आपलीच झाली असती , सारी दृश्ये आपलीच झाली असती, मोकळ्या अवकाशात , मनमुराद रमलो असतो !

आपल्या हृदयात सगळं प्रेम साठवून, आपण पाखरं व्हायला हवं होत !

सीमा या माणसांसाठीच आहेत विचार करा...! माणूस होऊन आपण काय मिळवलं?

जर मी नदी झाले आणि तू वाऱ्याचा झोका झालास तर ; काय होईल? ओहो !

वाऱ्याचा झोका जेव्हा नदीच्या अंगाला स्पर्श करतो , तेव्हा लाटा लाटा उसळतात , आपण दोघे जर भेटलो, तर असंच काहीतरी होईल !

सगळे म्हणतील "ही लाट जिथे जाईल तिथे, तिला कोणीही अडवू शकणार नाही, वार्याबरोबर तीही दूरदूर जाईल !

सीमा या माणसांसाठीच आहेत विचार कर...! माणूस होऊन आपण काय मिळवलं? पाखरं , नदी आणि वाऱ्याचे झोके कोणतीच सीमा त्यांना रोखू शकत नाही !

— संदीप सु. श. परुळकर