#११

सुख आणि वय

सुख आणि वय ! दोन डोळ्यां समान ! कधी न भेटती एकमेकां , दोघांचे वेगळेच प्रमाण !

सुख आणि वय यांचं , कधीच पटतंही नाही , वय वाढतं पण , सुख म्हणजे नक्की काय ? ते कधी कळतच नाही !

सुख भेटता भेटतच नाही , शोधता शोधता इथं तिथं , सारं वय मात्र ऊलटून जातं !

सुख म्हणतं मी आहे इथे रे , वय मग म्हणतं , दिसतं नाही कसे रे ? सुख म्हणतं , मृगजळ आहे मी रे !

जसं जसं वय वाढत गेलं , तसं तसं सुखही कंटाळत गेलं , मी इतकं देवूनही , काही उपयोग नाही , रूसुन दूर दूर निघून गेलं !

— संदीप सु. श. परुळकर